या ड्रेसचा रंग तुम्ही ओळखू शकता का?

चित्रात दाखवलेल्या ड्रेसचा रंग कोणता आहे, हे आपण सांगू शकता का? तुम्हाला हा प्रश्न अतिशय वेळ खाऊ वाटत असला, तरी इंटरनेट जगतात, सोशल नेटवर्किंगवर याची चर्चा सुरू आहे.

Updated: Mar 1, 2015, 06:50 PM IST
या ड्रेसचा रंग तुम्ही ओळखू शकता का? title=

मुंबई : चित्रात दाखवलेल्या ड्रेसचा रंग कोणता आहे, हे आपण सांगू शकता का? तुम्हाला हा प्रश्न अतिशय वेळ खाऊ वाटत असला, तरी इंटरनेट जगतात, सोशल नेटवर्किंगवर याची चर्चा सुरू आहे.

कुणी या ड्रेसला निळा, कुणी काळा म्हणतयं,  कुणी तरी सफेद, ही चर्चा सोशल नेटवर्किंग साईट टम्बलरपासून सुरू झाली, हळूहळू याविषयीची चर्चा ट्विटरवर सुरू झाले आणि प्रचंड रिट्ववीट होण्यास सुरूवात झाली. या विषयात फारस तथ्य नसलं तरी एवढे रिटवीट होण्याची कारणं काय असावीत, हा मात्र महत्वाचा प्रश्न आहे.

या ड्रेसवर सोशल नेटवर्कि्ंगवर जेवढी चर्चा होतेय, तेवढ्याच शिव्याही पडतायत, काहींचं म्हणणं आहे की, यावर एवढी चर्चा का, हा काय देशासाठी महत्वाचा प्रश्न नाही, की ज्यावर महाचर्चा झाली पाहिजे, या उदाहरणावरून एवढं मात्र नक्की की, नको त्या विषयांना सोशल नेटवर्किंगवर महत्व न दिलेलं, म्हणजे त्यावर न बोललेलं बरं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.