यू-ट्यूब विषयी सर्वात महत्वाची माहिती थोडक्यात

तुम्ही यू-ट्यूबवर सतत व्हिडीओ पाहत असतात, बराच वेळ तुमचा यू-ट्यूबवर जातो, पण यू-ट्यूबबद्दल ही सर्वात महत्वाची माहिती तुम्ही थोडक्यात जरूर जाणून घ्या.

Updated: Jun 23, 2016, 06:54 PM IST
यू-ट्यूब विषयी सर्वात महत्वाची माहिती थोडक्यात title=

मुंबई : तुम्ही यू-ट्यूबवर सतत व्हिडीओ पाहत असतात, बराच वेळ तुमचा यू-ट्यूबवर जातो, पण यू-ट्यूबबद्दल ही सर्वात महत्वाची माहिती तुम्ही थोडक्यात जरूर जाणून घ्या.

हे तुम्हाला माहिती आहे का? 

प्रत्येक मिनिटाला यू-ट्युबवर ३०० तासांचे नवे व्हिडिओज अपलोड होतात.

यू-ट्युबवर दररोज ४०० कोटी व्हिडिओज पाहिले जातात.

यू-ट्युबला भेट देणारा युजर साधारणपणे ४० मिनिटे यू-ट्युबवर खर्च करतो.

मोबाईलवरून यू-ट्युबला दररोज १०० कोटी व्हिडिओज पाहिले जातात.

१ लाख पेक्षा अधिक सदस्य असलेले यू-ट्युब १७ हजार चॅनेल्स आहेत.

यू-ट्युबबला २०१५ मध्ये फक्त जाहिरातींच्या माध्यमातून ४२८ कोटी डॉलर्स उत्पन्न मिळाले होते.