नवी दिल्ली : नोटाबंदीदरम्यान बँका तसेच एटीएमच्या बाहेर मोठ्याल्या रांगा अद्याप कमी झालेल्या नाहीत. काही लोकांकडे अजूनही 500 रुपयांच्या नोटा आहेत ज्या ते बदलू शकत नाहीयेत.
यातच एक अशी बातमी आलीये ज्याद्वारे तुम्ही 500 रुपयांच्या बदल्यात 600 रुपय़े मिळवू शकता. टेलिकॉम कंपनी टेलिनॉर कंपनीने बंद झालेल्या 500 रुपयांच्या नोटावर ऑफर सुरु केलीये. या ऑफरअंतर्गत 500 रुपयांच्या जुन्या नोटेच्या रिचार्जवर तुम्ही 600 रुपयांचा टॉकटाईम मिळवू शकता.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलंय की, सरकारने बंदी घातलेल्या 500 रुपयांच्या रिचार्जवर अतिरिक्त टॉकटाईम दिला जाईल. यासोबतच कंपनीने सात रुपयांचे विशेष रिचार्ज कुपनही सुरु केलेय. ज्यात 28 दिवसांसाठी एका कॉलसाठी 25 पैसे प्रति मिनिट देण्यात आलेत.
#Telenor is still accepting old Rs.500 note. Offer valid till 15th Dec’16. pic.twitter.com/0BRSfJ3mEn
— Telenor India (@TelenorIndia) November 26, 2016