पोकेमॉनसाठी तिनं सोडली नोकरी

पोकेमॉन गो या गेमचं सध्या साऱ्या जगाला वेड लागलं आहे.  ब्रिटनमध्ये 26 वर्षीय सोफिया पेड्राझाया तरुणीनं महिना 2 हजार पाऊंडाची नोकरी सोडून पोकेमॉनशी संबंधीत काही महत्वाच्या व्यक्तीरेखा विकायला सुरुवात केली आहे. 

Updated: Jul 25, 2016, 07:14 PM IST
पोकेमॉनसाठी तिनं सोडली नोकरी  title=

लंडन : पोकेमॉन गो या गेमचं सध्या साऱ्या जगाला वेड लागलं आहे.  ब्रिटनमध्ये 26 वर्षीय सोफिया पेड्राझाया तरुणीनं महिना 2 हजार पाऊंडाची नोकरी सोडून पोकेमॉनशी संबंधीत काही महत्वाच्या व्यक्तीरेखा विकायला सुरुवात केली आहे. 

50 पाऊंडापासून सुरु होणाऱ्या या व्यक्तीरेखांची किंमत जास्तीत जास्त 7 हजार 300 पाऊंडांपर्यंत असते. सध्या पोकेमॉन गो या खेळात अनेक प्रकारच्या व्यक्तीरेखा सारख्या लागत प्लेअरच्या सहकार्यासाठी हव्या असतात.  

त्या व्यक्तीरेखा जितक्या ताकदवान तितकी त्यांची किंमत जास्त असते. या व्यक्तिरेखा ईबे सारख्या अनेक वेबसाईट्सवर खरेदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सोफियालाही या गेमचं वेड लागलं आहे. त्यातूनच तिनं हा नवा व्यवसाय सुरु केला आहे. 

पोकेमॉन गो खेळताना या व्यक्तीरेखा रस्त्यात शोधत फिरावं लागतं. अशा काही व्यक्तीरेखा ज्यांना मिळतात, ते लोक त्या एकतर विकू शकतात किंवा स्वतः जिंकण्यासाठी त्यांची मदत घेऊ शकतात. सोफियानं अशा प्रकारे हा नवा व्यवसाय सुरु केला आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.