मोटोच्या स्मार्टफोनवर भरघोस सूट

मोटोचा स्मार्टफोन घ्यायचा विचार असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कंपनीने या स्मार्टफोनवर भरघोस सूट दिलीये. तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत सवलत सुरु केलीये. फ्लिपकार्टवर सध्या ही सवलत देण्यात आलीये.

Updated: Jan 14, 2016, 09:57 AM IST
मोटोच्या स्मार्टफोनवर भरघोस सूट title=

नवी दिल्ली : मोटोचा स्मार्टफोन घ्यायचा विचार असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कंपनीने या स्मार्टफोनवर भरघोस सूट दिलीये. तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत सवलत सुरु केलीये. फ्लिपकार्टवर सध्या ही सवलत देण्यात आलीये.

मोटोरोलाच्या मोटो जी थर्ड जनरेशन, , मोटो जी, मोटो एक्स प्ले यांच्या किंमतीत तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत कपात करण्यात आलीये. त्यानंतर मोटो जी थर्ड जनरेशनच्या ८ जीबी मॉडेलची किंमत ९ हजार ९९९ आणि १६ जीबीची किंमत १० हजार ९९९ रुपये झालीये. तसेच मोटो जी टर्बो १२ हजार ४९९ रुपयांत उपलब्ध होणार आहे. 

मोटो एक्स प्ले १६ जीबी १६ हजार ४९९ आणि ३२ जीबी १७ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफर मोटोरोलाच्या सर्व फोनवर उपलब्ध आहे. मोटो जीच्या थर्ड जनरेशन फोनवर चार हजार तर टर्बो एडिशनवर पाच हजार रुपयांपर्यंतची सवलत देण्यात येतेय. तसेच एक्स प्लेवर सात हजार रुपयांपर्यंतची सवलत उपलब्ध आहे.