हे भिकारी एटीएम कार्ड स्वाइप मशीनद्वारे मागतात भीक

देशात असे कोणतेही ठिकाण नसेल जिथे भिकारी भीक मागताना दिसणार नाहीत. मात्र देशात असेही भिकारी आहे जे टीएम कार्ड स्वाइप मशीनद्वारे भीक मागतात.

Updated: Dec 25, 2015, 03:12 PM IST
हे भिकारी एटीएम कार्ड स्वाइप मशीनद्वारे मागतात भीक title=

नवी दिल्ली : देशात असे कोणतेही ठिकाण नसेल जिथे भिकारी भीक मागताना दिसणार नाहीत. मात्र देशात असेही भिकारी आहे जे टीएम कार्ड स्वाइप मशीनद्वारे भीक मागतात.

हैदराबादमध्ये असा भिकारी पाहायला मिळाला. एक महिला कार चालवत असताना सिग्नल लागल्यावर एक भिकारी त्या महिलेजवळ आला आणि भीक मागू लागला. मात्र महिलेने सुट्टे पैसे नसल्याचे सांगत भीक देण्यास नकार दिला. 

तेव्हा कार्ड स्वाईप करुनही आपण भीक घेत असल्याचे त्या भिकाऱ्याने सांगितले. तसेच त्याने त्याच्याजवळ असलेली मशीनही दाखवली. हे पाहून मात्र लोकांना काही हसू आवरले नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय.