सावधान ! व्हॉटस् अ‍ॅपवर तुमची होऊ शकते फसवणूक

आजपर्यंत फेसबूक, ट्विटर किंवा जीमेल अकाऊंट हॅक होत होते.

Updated: Feb 7, 2016, 08:56 AM IST
सावधान ! व्हॉटस् अ‍ॅपवर तुमची होऊ शकते फसवणूक title=

वॉशिंग्टन : आजपर्यंत फेसबूक, ट्विटर किंवा जीमेल अकाऊंट हॅक होत होते पण आता तुमचं व्हॉट्सअॅप देखील सुरक्षित नाही. व्हॉटस् अ‍ॅप वापरताना आता तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे.

व्हॉटस् अ‍ॅप वापरणाऱ्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती काढून घेतली जाऊ शकते. जर तुम्हाला कोणी एखादी लिंक पाठवली तर लिंक तुम्हाला एका डिस्काऊंट पेजवर नेते आणि तुम्ही ऑफरसाठी तेथे विचारलेली माहिती भरता.

 

माहिती भरल्यानंतर तुम्हाला बनावट वेबसाईटवर नेले जाते, तेथे तुमच्या फोनला मालवेअरचा फटका बसतो आणि तुमची महत्त्वाची माहिती लिक होते. व्हॉटस् अ‍ॅपची आज जवळपास एक अब्ज लोक वापरत आहेत. त्यामुळे येथे फसवणूक करणाऱ्यांची संख्या देखील वाढतांना दिसतेय.

व्हॉटस् अ‍ॅपवर जर तुम्हाला ऑफरचे किंवा इतर काही संशयासंपद मेसेजेस वाटले तर त्यावर क्लिक करू नका.