www.24taas.com, मुंबई
डिलर्सच्या शोरुममध्ये ग्राहकांच्या घटत्या संख्येमुळे कार कंपन्यांची बेचैनी वाढतेय. व्याज दरात घट आणि आकर्षक ऑफर्स असूनही सध्या ग्राहकांची कार खरेदीसाठी गर्दी काही वाढताना दिसत नाही. म्हणूनच कंपन्या एकावर एक अनोख्या ऑफर्स जाहीर करताना दिसत आहेत.
डिलर्सच्या म्हणण्यानुसार, कार सेक्टरमध्ये सध्या मंदीचं वातावरण आहे. ग्राहकांची विचारसरणी सध्या कार खरेदीबाबत फारशी सकारात्मक नसल्याने कर्जाचे दर कमी करुनही सध्या कारची विक्री वाढताना दिसत नाहीए. नोव्हेंबर महिन्यापासून कारच्या विक्रीत घट होतेच आहे. त्यामुळे कार कंपन्यांची चिंता दिवसेंदिवस वाढतंच आहे. त्यामुळेच देशातील सगळ्यात जुनी कार कंपनी असलेल्या टाटा मोटर्ससह अनेक कंपन्यांनी काही युनिक ऑफर जाहीर केल्या आहेत.
एक नजर टाकुयात अशाच काही आकर्षक ऑफर्सवर...
फोक्सवॅगन
कुठल्याही जुन्या कारच्या बदल्यात एक रुपयात व्हेंटोची डिलिव्हरी
राहिलेली रक्कम एका वर्षात फेडण्यासाठी तीन वर्षात हफ्त्यात देण्याची सूट
होंडा मोटर्स
होंडा सिटी आणि होंडा ब्रियोच्या खरेदीवर सहज कर्ज
ग्राहकांना केवळ ०.०१ टक्के व्याजावर कर्जाची सुविधा
स्कोडा इंडिया (डीलर ऑफर)
रॅपिड खरेदी केल्यास स्कोडा फाबिया फ्री देण्याची ऑफर
फ्री स्कोडा फाबियाची डिलिव्हरी पाच वर्षांनंतर
टाटा मोटर्स
मांझाच्या खरेदीवर ५० हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काऊंट बरोबर ‘बाय-बॅक’ ऑफर
कार व्यवस्थित ठेवल्यास तीन वर्षांनंतर ६० टक्के किंमतीवर ‘बाय-बॅक’
क्रेडिट कार्डवर नॅनो विकत घेण्याची ऑफर
मारुती सुझुकी
आल्टो 800 च्या खरेदीवर डिस्काऊंटबरोबर हॉलिडे पॅकेज
फक्त १३९९ रुपयांमध्ये दिवसभराचं डोमेस्टिक हॉलिडे पॅकेज
ह्युंदाई मोटर्स
कॅश डिस्काऊंट शिवाय `पे-बॅक` पॉईंटने कार खरेदी करण्याची संधी
`पे-बॅक`च्या एकत्र केलेल्या पॉईंट्सच्या बदल्यात इऑन खरेदी करण्याची ऑफर