मुंबईः महिलांची सुरक्षा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यात स्वतःहून महिलांनी आपलं संरक्षण करणं गरजेचं असतं. महिलांनी आपलं संरक्षण कसं करावं? हा प्रश्न तर येणारच... म्हणूनच सरकारसोबतच काही विद्यार्थ्यांनीही या सुरक्षेच्या मोहिमेत सहभाग घेतलाय.
अशोका इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी महिलांच्या संरक्षणासाठी एक आगळा वेगळा प्रयोग केला आहे. त्यासाठी त्यांनी आपला या प्रयोगाचं प्रदर्शन महाविद्यालयाच्या परिसरात भरवलं होतं.
या विद्यार्थ्यांनी अशी काही गोष्टीचा शोध लावला आहे की, ज्यामुळं महिला जेव्हा अडचणीत असतील ते लगेच समजू शकेल. बीटेक कॉम्प्युटर सायन्सची व्दितीय वर्षाची सलोनी यादव हिनं एक फॅशनेबल सॅंडल तयार केली आहे. त्या सॅंडलमध्ये जीपीएस आहे त्यामुळं जी महिला ही सॅंडल घालेल आणि जेव्हा ती अडचणीत असेल त्यावेळी त्या महिलेचं लोकेशन सांगते. सॅंण्डलची किंमत 2800 रुपये आहे. या सॅंडलला पाच ते सहा महिन्यातून फक्त दोन तास चार्ज करावी लागते.
तर सीएस व्दितीय वर्षाला शिकत असलेला रिजुल पांडे यानं सॅंडलमध्ये शॉक असलेली सॅंडल तयार केली आहे. ही सॅंडल कोणाला मारल्यास त्या व्यक्तिला शॉक बसेल. जी महिला ही सॅंडल घालेल ती शॉकपासून सुरक्षित राहते. या सॅंडलची किंमत एक हजार रुपये आहे.
सीएसची दिक्षा पाठक आणि इलेक्ट्रॉनिक्स अॅड कम्युनिकेशनची अंजली या दोघींनी मिळून लेडीज जीन्स तयार केलीय. यामध्ये असं यंत्र आहे ज्यामुळं आपातकालीन परिस्थितीत एक बटण दाबल्यास अशा पाच व्यक्तिंना सूचना जाईल ज्यांचे नंबर त्यात समाविष्ट असतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.