नवी दिल्ली: अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउंसिल ऑफ इंडिया (एएससीआय)ला आढळलं की, भारती एअरटेल आपल्या फोर जीच्या जाहिरातीत जो 'लाइफटाइम फ्री मोबाईल कनेक्शन'चा दावा करत आहे, तो दिशाभूल करणारा आहे. एएससीआयनं देशातील नंबर वन कंपनी भारती एअरटेलला 7 ऑक्टोबरपर्यंत या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
एएससीआयनं आपल्या ऑर्डरमध्ये म्हटलं, 'या जाहिरातीमुळं चॅप्टर 1.4चं उल्लंघन होतंय. एअरटेलच्या या जाहिरातीविरोधात तक्रार आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. एएससीआयनं कंपनीला 7 ऑक्टोबरपर्यंत जाहिरात प्रसारण बंद ठेवण्याचे आणि त्यात सुधारणा करायला सांगितलंय.'
आणखी वाचा - खुशखबर! देशभरात एअरटेलची 4G सेवा सुरू
कंपनीनं जाहिरात मधील दावा खरा असल्याचं म्हटंलय. 4जी टेक्नॉलॉजीमध्ये इंटरनेटची स्पीड खूप जास्त आहे आणि जगभरानं ते स्वीकारलं आहे. एअरटेलचे प्रवक्ते म्हणाले, 'भारतात 4जीची वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी देणारी कंपनी एअरटेल आहे. कंपनीनं जाहिरातीत केलेले सर्व दावे कडक टेस्ट कंडिशन्सवर आधारित आहेत.'
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एअरटेलकडून देशभरात 4जी सेवा सुरू करण्याची औपचारिक घोषणा झाल्यानंतर ही जाहिरात टिव्हीवर लॉन्च केली गेली. या जाहिरातीत 'जर आपलं नेटवर्क आमच्या पेक्षा फास्ट असेल तर आयुष्यभर मोफत फोन बिल भरा' सांगण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.