अॅपलचा आयफोन ४एस ९ हजार ९९९ रुपयांना

पाच वर्षांपूर्वी १४ ऑक्टोबर २०११मध्ये लाँच झालेला अॅपलचा आयफोन ४एस भारतात ९ हजार ९९९ रुपयांना मिळतोय. २०१४पर्यंत हा स्मार्टफोन भारतात ३१ हजार ५०० रुपयांना मिळत होता. मात्र त्यानंतर या स्मार्टफोनचे उत्पादन कंपनीने बंद केले. 

Updated: Jan 9, 2016, 03:52 PM IST
अॅपलचा आयफोन ४एस ९ हजार ९९९ रुपयांना title=

नवी दिल्ली : पाच वर्षांपूर्वी १४ ऑक्टोबर २०११मध्ये लाँच झालेला अॅपलचा आयफोन ४एस भारतात ९ हजार ९९९ रुपयांना मिळतोय. २०१४पर्यंत हा स्मार्टफोन भारतात ३१ हजार ५०० रुपयांना मिळत होता. मात्र त्यानंतर या स्मार्टफोनचे उत्पादन कंपनीने बंद केले. 

ग्रीनडस्ट या वेबसाईटवर हा आयफोन ९ हजार ९९९ रुपयांना मिळतोय. ग्रीनडस्ट वेबसाईटनुसार, कंपनीच्या आउटलेटकडून मिळणाऱ्या आयफोनसारखाच हा आयफोन आहे. तसेच हा फोन अनयू्झ्ड असल्याचे कंपनीने म्हणणे आहे. तसेच कंपनी या आयफोनवर ६ महिन्यांची वॉरंटी देतेय.

सध्या आयफोनचे ६एस आणि ६एस प्लस हे चर्चेत आहेत. लवकरच आयफोन ७ही लाँच होणार आहे. मात्र स्वस्त आयफोन खरेदी करायचा असल्यास ते हा आयफोन घेऊ शकतात.