मुंबई : एअरटेलच्या ४जी जाहिरातीतून घराघरात पोहोचलेली एअरटेल गर्ल म्हणजेच साशा छेत्री सध्या चर्चेत आहेत. सोशल मीडियावर साशाबाबत जोरदार चर्चा सुरु आहेत. यात साशाविरोधात केस दाखल झाल्यानंतर एअरटेल सोडून ती रिलायन्स जिओसाठी काम करणार असल्याचं बोललं जातंय.
मात्र यामागचं खरं सत्य माहीत आहे का?..खरतर या बातमीने लोकांना एप्रिल फुल बनवलं जातंय. यात शिलाँगच्या उमियाम लेकवर राहणाऱ्या एका व्यक्तीला ४जीवर खराब सिग्नलमुळे इंडिया-वेस्ट इंडिज सामना पाहता आला नाही. यावरुन नाराज झालेल्या त्या व्यक्तीने साशा आणि एअरटेलविरोधात केस दाखल केलीये.
साशा एअरटेल सोडणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतेय. याआधी २०१५मध्ये साशाला इंटनेटवर सर्वाधिक नापसंती मिळाली होती. तसेच तिचे वादग्रस्त फोटोजही शेअर करण्यात आले होते.