स्मार्टफोन पाण्यात भिजला तर करा हे 5 उपाय

तुमचा स्मार्टफोन पाण्यात पडला किंवा पावसात भिजला असेल तर तो खराब होऊ नये म्हणून तुम्ही हे उपाय करू शकता.

Updated: Jul 28, 2016, 02:16 PM IST
स्मार्टफोन पाण्यात भिजला तर करा हे 5 उपाय title=

मुंबई : तुमचा स्मार्टफोन पाण्यात पडला किंवा पावसात भिजला असेल तर तो खराब होऊ नये म्हणून तुम्ही हे उपाय करू शकता.

1. फोन पाण्यात पडला तर तो लगेचच स्वीच ऑफ करा.

2.फोन पाण्यात भिजल्यानंतर त्यामधील बॅटरी, मेमरी कार्ड आणि सिम कार्ड काढून टाका.

3. भिजलेला फोन पंख्याखाली सुकण्यासाठी ठेवा.

4. मॉइश्चर वाळवण्यासाठी फोन आणि बॅटरी तांदुळात ठेवा.

5. तीन दिवसानंतर फोन पूर्ण सुकल्यानंतर सुरु करा.