‘फ्लिपकार्ट’चे 400 कर्मचारी बनले करोडपती

गेल्या काही महिन्यांमध्ये भारताची सर्वात मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी ‘फ्लिपकार्ट’चं व्हॅल्युएशन सतत वाढतच गेल्याचं दिसून येतंय. त्याचाच फायदा या कंपनीत काम करणाऱ्या 400 कर्मचाऱ्यांनाही झालाय. 

Updated: Aug 14, 2014, 11:52 AM IST
‘फ्लिपकार्ट’चे 400 कर्मचारी बनले करोडपती title=

बंगळुरू : गेल्या काही महिन्यांमध्ये भारताची सर्वात मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी ‘फ्लिपकार्ट’चं व्हॅल्युएशन सतत वाढतच गेल्याचं दिसून येतंय. त्याचाच फायदा या कंपनीत काम करणाऱ्या 400 कर्मचाऱ्यांनाही झालाय. 

कंपनीमध्ये फूल टाईम काम करणाऱ्या जवळपास 25 टक्के कर्मचाऱ्यांजवळ कंपनीचे शेअर्स आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, फ्लिपकार्टच्या जवळपास अर्ध्या म्हणजेच जवळपास 14,000 कर्मचारी फुल टायमर आहेत आणि यातील 2000 कर्मचाऱ्यांजवळ कंपनीचे शेअर्स आहेत.  
फ्लिपकार्टच्या ‘एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम’ (ESop) ची माहिती ठेवणाऱ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे 400 कर्मचारी आता करोडपती बनलेत. यातील 15-20 लोक असेही आहेत जे सीनिअर वाईस प्रेसिडेंट किंवा त्यापेक्षा वरील पदावर आहेत. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी कंपनी जॉईन केलीय. कंपनीत ESop तून मिळणारे ऑप्शन 4 वर्षांत शेअरमध्ये बदलले जातात.  

बंगळुरू स्थित ‘फ्लिपकार्ट’ या कंपनीचं व्हॅल्युएशन 85 करोड डॉलर (जवळपास 5200 करोड रुपये) होतं. यंदा, कंपनीनं मार्केटमधून 15 करोड डॉलर (900 करोडहून अधिक) मिळवलेत. फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांच्या मते, हा त्या लोकांसाठी लॉन्ग टाईम रिव़ॉर्ड आहे, जे कंपनीवर विश्वास ठेवतात. ESop कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देण्याचं काम करतं, असंही त्यांनी म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.