<b> टू जी परवडत नाही मग, थ्री जी घ्या! </b>

दिवसेंदिवस स्मार्ट फोनचा वाढता वापर पाहून स्वस्त होत जाणाऱ्या थ्री जी हँडसेटमुळे मोबाइल कंपन्यानी टू जी ऐवजी आता थ्री जी इंटरनेटचा आधार वाढत चालल्याचं दिसतंय. कारण, मोबाईल कंपन्यांनी ‘टू जी’चे रेट वाढवताना थ्रीजीचे दर मात्र कायम ठेवले आहेत. म्हणून महिनाभरासाठी टू जी पेक्षा थ्री जी मोबाइल इंटरनेट पॅक स्वस्त झाला आहे.

Updated: Nov 1, 2013, 08:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दिवसेंदिवस स्मार्ट फोनचा वाढता वापर पाहून स्वस्त होत जाणाऱ्या थ्री जी हँडसेटमुळे मोबाइल कंपन्यानी टू जी ऐवजी आता थ्री जी इंटरनेटचा आधार वाढत चालल्याचं दिसतंय. कारण, मोबाईल कंपन्यांनी ‘टू जी’चे रेट वाढवताना थ्रीजीचे दर मात्र कायम ठेवले आहेत. म्हणून महिनाभरासाठी टू जी पेक्षा थ्री जी मोबाइल इंटरनेट पॅक स्वस्त झाला आहे.
कॉलिंग, एसएमएस व्यतीरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे अॅप्स, गेम्स यासाठी मोबाइलवरील इंटरनेटचा वापर वाढताना दिसत आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कॉलिंग आणि एसएमएससाठी आकर्षक प्लान न देता, इंटरनेटसाठी आकर्षक आणि स्वस्त प्लॅन देण्याचे सुरू केले आहेत. ‘१२३ रुपयात एक जीबी थ्री जी इंटरनेट’ ही सुविधा देण्याची घोषणा जुलैमध्ये सर्वप्रथम करून रिलायन्सनं आघाडी घेतली होती. त्यानंतर इतर कंपन्यानीही थ्री जी दर कमी केले. व्होडाफोन, एअरटेल या कंपन्यांचे थ्री जी पॅक २ किंवा ३ पैसे प्रति १० केबी या दराने उपलब्ध केले आहेत. ऑफर्समध्ये एक जीबी थ्री जी सेवा फक्त सव्वाशे रुपयात महिन्याभरासाठी मिळतेय. टू जी इंटरनेटसाठी १५० रुपये एक-दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या दरवाढीमुळे मोजावे लागत आहेत.
चांगला स्पीड, नवीन तंत्रज्ञान आणि स्वस्तात उपलब्ध असणारे थ्री जी हॅन्डसेट या आकर्षणामुळे ग्राहक टू जी पेक्षा थ्री जीला जास्त प्राधान्य देताना दिसत आहे. कंपन्यांनीही थ्री जीच्या प्रसारासाठी विविध ऑफर्स, योजना सुरू करून या संख्येत भर पाडली आहे. टू जी सेवा फारपूर्वीपासून उपलब्ध असल्याने, त्याचे ग्राहक जास्त आहेत. स्वस्तातील थ्री जी हॅन्डसेट आणि थ्री जी इंटरनेट पॅक यामुळे ग्राहक थ्री जी सेवेला जास्त प्राधान्य देत आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता यावा म्हणून दरांमध्ये ८० टक्क्यांनी घट करण्यात आली आहे, असं व्होडाफोन इंडियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक माथूर यांनी म्हटलंय.

ग्राहकांना, थ्री जी चे दर अधिक असल्याने नवीन तंत्रज्ञान, सुविधांचा लाभ घेता येत नव्हता. ग्राहकांना अशा सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी थ्री जी चे दर कमी करण्यात आले. यामुळे ग्राहकांचा थ्री जी डेटा वापरात भर पडली आहे, असं रिलायन्स कम्युनिकेशनच्या प्रवक्यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.