वनप्लस स्मार्टफोनवर 16 हजारांचा डिस्काऊंट

चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लस 16 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट देत आहे.

Updated: Apr 18, 2016, 06:20 PM IST
वनप्लस स्मार्टफोनवर 16 हजारांचा डिस्काऊंट title=

मुंबई: चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लस 16 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट देत आहे. वनप्लस वन, वनप्लस 2 आणि वनप्लस x या फोनवर हा डिस्काऊंट मिळणार आहे, तसंच तुम्हाला यासाठी तुमचा जुना स्मार्टफोन द्यावा लागणार आहे. अॅमेझॉन आणि रिब्लोबवर ग्राहकांना या डिस्काऊंटचा लाभ घेता येणार आहे. 

वनप्लसचा हा स्मार्टफोन जेव्हा तुमच्या घरी येईल तेव्हा तुम्हाला जुना फोन परत द्यावा लागेल, आणि तेव्हाच कॅशबॅकही मिळणार आहे. 

वन प्लस X चे फिचर्स

5 इंचाच्या या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 2.3 GHZ स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. तसंच 16 जीबीची इंटरनल मेमरी असून 128 जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं मेमरी वाढवता येऊ शकते. 

या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 5.1.1 लॉलीपॉपवर हा फोन चालेल.

वनप्लस 2 चे फिचर्स

वनप्लस 2 या स्मार्टफोनचा डिस्प्ले 5.5 इंचाचा आहे. या फोनची रॅम 4 जीबीची आहे. तर रियर कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. या फोनच्या कॅमेरातून काढलेले फोटो क्वालिटी 50 मेगापिक्सल्या कॅमेराइतकी असेल असा दावा कंपनीनं केला आहे. 

या फोनमध्ये इनबिल्ड असलेल्या कॅमेरा ऍपमुळे फोटो आणखी चांगले दिसतात, असं कंपनीचं म्हणणं आहे.