१० लाखांची वेस्पा भारतात होतेय लाँच

भारताच्या रस्त्यांवर लाखोंची कार किंवा बाईक तुम्ही पाहिल्या असतीस पण आता तुम्हाला लाखो रुपये किंमत असलेली स्कूटी देखील पाहायला मिळणार आहे.

Updated: Mar 25, 2016, 04:48 PM IST
१० लाखांची वेस्पा भारतात होतेय लाँच title=

मुंबई : भारताच्या रस्त्यांवर लाखोंची कार किंवा बाईक तुम्ही पाहिल्या असतीस पण आता तुम्हाला लाखो रुपये किंमत असलेली स्कूटी देखील पाहायला मिळणार आहे.

इटालियन ऑटोमेकर कंपनी पियाजियोने दोन खास स्कुटर भारतात लाँच करण्याचं ठरवलं आहे. पियाजियो ९४६ ही स्कूटर ऑटोमोबाईल डिझाईनर आणि फॅशन डिझाईनरने डिझाईन केलं आहे.

पियाजियो या कंपनीला १३० वर्ष पूर्ण झाल्याने अरमानीने वेस्पा सोबत मिळून हि स्कूटी डिझाईन केली आहे. या स्कूटीची किंमत ही जवळपास ७ लाख रुपये आहे पण टॅक्स मिळून याची किंमत जवळपास १० लाख रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे आता भारतीय या स्कूटीला किती प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल.