नखाच्या रंगांवरून लागते आजारांची चाहूल...

वेगवेगळ्या आजारांमध्येही आपल्या नखाचे रंग बदलत जातात, असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनामुळे समोर आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 3, 2013, 07:43 PM IST

www.zee24taas.com, नवी दिल्ली
आपल्या नखांच्या रंगावरुन आपल्या तब्येतीची माहिती आपल्याला कळते, याचा तुम्हाला अंदाज असेलच. पण, वेगवेगळ्या आजारांमध्येही आपल्या नखाचे रंग बदलत जातात, असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनामुळे समोर आलंय.
उदाहरण द्यायचं झालं तर, सफेद नखाच्या रंगावरुन लिव्हरसंबंधीत ‘हेपेटाइटस’ रोगाची माहिती मिळू शकते. तर पिवळ्या नखांवरून फुफ्फुसासंबंधित रोगांविषयी माहिती मिळते. ही नखं आकारानं मोठी असतात आणि त्यांची वाढ हळूहळू होते.

अर्धेच नख सफेद आणि अर्ध गुलाबी असेल तर यकृतासंबंधित आजारांविषयी माहिती समजते. नखांचा रंग अर्धा सफेद आणि अर्धा पिवळा असेल तर हे शरिरात रक्ताची कमतरतेचं लक्षण आहे.