'फौजदारा सूर्यवंशी, तुला आजच खल्लास करतो'

साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधान भवनात काही आमदारांनी मारहाण केली. याबाबत मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीत प्रमुख पाच आमदारांविरोधा तक्रार करताना १४ ते १५ आमदार माहणार करीत असल्याचे म्हटले आहे. सूर्यवंशी यांचा जबाब झी २४ तासच्या हाती लागला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 20, 2013, 08:18 PM IST

www.24taas.com, मुंबई
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधान भवनात काही आमदारांनी मारहाण केली. याबाबत मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीत प्रमुख पाच आमदारांविरोधा तक्रार करताना १४ ते १५ आमदार माहणार करीत असल्याचे म्हटले आहे. सूर्यवंशी यांचा जबाब झी २४ तासच्या हाती लागला आहे.
सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. त्यानंतर पाच आमदारांना निलंबित करण्यात आलेय. निलंबित पाच आमदारांमध्ये मनसेचे राम कदम, बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जैयस्वाल आणि शिवसेनेचे राजन साळवी यांचा समावेश आहे. दोषींविरोधात कठोर कारवाईचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल दिले होते. त्यानुसार आज या आमदारांवर निलंबन कारवाई झाली.

सचिन सूर्यवंशी यांचा झी २४ तासकडे आलेला जबाब
>दुपारी १२.३०वाजण्याच्या सुमारास विधानभवनातील उपाहरगृहाच्या दिशेन जात असताना पाठिमागून जोरजोरात आरडोओरडा ऐकू आला की, धरा पकडा हाच तो सूर्यवंशी.
>त्यावेळी मी पाठिमागे वळून पाहिले असता आमच्या दिशेने आमदार राम कदम आले. त्यांच्यासोबत आमदार क्षितिज ठाकूर आणि इतर १४ ते १५ जण होते. त्यावेळी आमदार क्षितिज यांनी माझ्याकडे बोट दाखवून हाच तो सूर्यवंशी असे म्हणाले असता त्यांच्यासोबत असलेल्या आमदार राम कदम यांनी हाताच्या ठोशाने माझ्या गालावर जोरदार आघात केला.
>आणि ते मला म्हणाले की, तू आमदारांना नडतोस काय? तुला आजच खल्लास करतो, असे म्हणून त्यांनी आणि त्यांच्यासोबत असललेल्या लोक प्रतिनिधींनी मला लाथाबुक्यांनी मारहाण केली.
>त्याचवेळी मी आमदारांच्या हातून सुटका करून घेऊन जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करत पळू लागलो असता १४ ते १५ लोकप्रतिनिधींनी माझा पाठलाग करून मला पुन्हा पकडले. सर्वांनी मला लाथाबुक्क्यांनी डोक्यावर, छातीवर आणि पाठिवर मारहाण केली.
>या झटापटीत मी खाली पडलो. तरीसुदुधा ते मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. त्यानंतर मी उठण्याचा प्रयत्न करीत असताना आमदार राम कदम यांनी माझा गळा हाताने जोरात आवळला आणि ते म्हणाले की तू महाराष्ट्रात कुठेही नोकरीस जा. तुला जिवंत सोडणार नाही.
>त्याचदरम्यान आमदार क्षितिज ठाकूर यांनी समोरून माझ्या गुप्त भागावर जोरात लाथ मारली आणि फौजदारा तुला मस्ती आली आहे. तुला खल्लास करतो, अशी धमकी दिली.