www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
कोकणात बिबट्याची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची आकडेवारी गेल्या काही वर्षात समोर येत होती. आता नव्याने जाहीर झालेल्या वनजीव गणणेत सकारात्मक चित्र समोर आलंय. यंदा बिबट्यांची संख्या 26 नं वाढलीय. असं असल ती वेळेला वनक्षेत्रातील अन्य वनजीवांची संख्या मात्र झपाट्याने कमी झाल्याची निदर्शनास येतंय.
गेल्या काही वर्षात कोकणात बिबट्यांची संख्या कमी होत असल्याचं वनविभागाच्या गणनेत समोर आलं होतं. जंगलात अन्न मिळत नसल्यानं त्याच्या शोधात नागरी वस्तीत बिबट्या आल्याच्या घटना घडत होत्या. त्यावेळी वन्यजीवांच्या शिकारीसाठी जंगलात लावलेल्या पिंजऱ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. 400 बिबटे असलेल्या कोकणात 2010 साली अवघे 80 बिबटे शिल्लक राहिल्याचं समोर आलं होतं.
मात्र, आता एक दिलासा देणारी बाब म्हणजे बिबट्यांची संख्या 80 वरुन वाढून 106 वर पोहचलीय. शिकार करणाऱ्यांवर झालेली कारवाई आणि बिबट्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाने उचललेल्या पावलांमुळे बिबट्यांच्या संख्येत सकारात्मक वाढ दिसून आलीय, अशी माहिती वनाधिकारी अशोक लाड यांनी दिलीय.
एकीकडे बिबट्यांची संख्या वाढत असताना कोकणातील गवा, कोल्हे, साळींदर, सांबर, निलगाय आणि ससे यांची संख्या मत्र झपाट्याने कमी होत असल्याचंही उघड झालंय. रत्नागिरीत ६२.५९ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे. या क्षेत्रातल्या बिबट्यांच्या वचावासाठी आता प्रयत्न सुरू झालेत. कोकणात सुरू असलेली बिबट्या बचावाची मोहिम अपुरे कर्मचारी आणि साधनसामुग्रीच्या पार्श्वभूमीवर काम करताना वनविभागाची मात्र चांगलीच दमछाक होतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.