www.24taas.com,पालघर
देशातील बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलीये.
सोनियांच्या हस्ते राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानाचा शुभारंभ पालघरमधून झाला. यावेळी त्या बोलत होत्या. देशात कुपोषणाची समस्या गंभीर आहे. देशातली ४० टक्के बालकं कुपोषित आहेत. त्यामुळं कुपोषण निर्मुलनासाठी विषेश उपाययोजना सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रीय बाल आरोग्य योजनेंतर्गत देशातील अंगणवाडी, बालवाडी तसंच प्राथमिक शाळेतील आरोग्य तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी मेडिकल सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
देशात अशा स्वरूपाचे चार प्रकल्प वेगवेगळ्या भागांमध्ये राबवण्यात येतील. त्यापैकी पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं.