www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरीत सेक्स स्कँडल उघडकीय आले आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैगिक शौषण केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत अघड झालाय. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार दडपण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मीडियाला वृत्त समजल्याने हा प्रकार पुढे आलाय.
अर्धवट शिक्षण सोडलेल्या या अल्पवयीन मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेत एका एजंट महिलेने तिला वासनाकांडात ओढले. वर्षभरापासून लैगिक शौषणाला कंटाळलेल्या या मुलीनं एक सामाजिक संस्थेची मदत घेतली. या स्ंस्थेच्या मदतीने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या प्रकरणी या एजंट महिलेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केलीय. एजंट महिला या मुलीला बिअर पाजण्याची सवय लावून शहरातल्या काही राजकीय आणि बड्या व्यक्तिंकडे पाठवत असे, असं या अल्पवयीन मुलीनं पोलीस स्थानकात नोंदविलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. मात्र या मुलीला ज्या व्यक्तिंकडे पाठवलं जात असे त्यांची टोपणनावे असल्यानं यातील आरोपींपासून मीडियाला दूर ठेवण्यात आलंय.
दरम्यान, शहरातील ४० ते ४५ वयोगटातील बडे मासे असल्याचे पुढे आले आहे. तर दोन शासकीय अधिकारीही सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार दाबण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र, सेक्स रॅकेटचे भांडेफोड एका सामाजिक संस्थेने केलाय.
या सेक्स रॅकेटप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. या सेक्स रॅकेटमध्ये आणखी एका अल्पवयीन मुलीला ओढण्यात आल्याचे बोलले जात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ