चिपळूण बाजारपेठेत कपडा दुकानांना भीषण आग

चिपळूणच्या बाजारपेठेतील कपडा दुकानाला भीषण आग लागलीय. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागलीय. बाजारपेठेतील अनेक दुकानं आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. एका दुकानाला लागलेली आग मोठ्या वेगानं पसरतेय. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 9, 2014, 02:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चिपळूण/ रत्नागिरी
चिपळूणच्या बाजारपेठेतील कपडा दुकानाला भीषण आग लागलीय. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागलीय. बाजारपेठेतील अनेक दुकानं आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. एका दुकानाला लागलेली आग मोठ्या वेगानं पसरतेय. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
चिपळूणच्या नगराध्यक्ष रेहाना यांनी दिलेल्या माहितीनुसार चिपळूणमधील बाजारपेठेत एका जुन्या कपड्याच्या दुकानाच्या चौथ्या माळावर अचानक आग लागली. बघता बघता या आगीनं मोठं स्वरूप घेत आजुबाजुच्या दुकानांनाही आगीनं आपल्या ताब्यात घेतलं.
आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली. तर दुकानांचं खूप मोठं नुकसान झालंय. शिवाय चिपळूण बाजारपेठे अतिशय गजबजलेली असल्यामुळं आणि परिसरात किराणा आणि फटाक्यांचीही दुकानं आहेत. हे दुकानंही रिकामं करण्याचं काम सुरू आहे.
दरम्यान, आग विझवण्यासाठी खेडमधूनही अग्नीशमन दलाच्या गाड्या मागविण्यात आल्याचं कळतंय. सध्या आग आटोक्यात आली असल्याचं चिपळूणच्या नगराध्यक्षांनी झी मीडियाला सांगितलंय.
व्हिडिओ पाहा -

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.