www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
कोकण रेल्वेच्या २४व्या वर्धापन दिनानिमित्त सीवूड-दारावे येथील कोकण रेलविहारमध्ये ८ ते १५ ऑक्टोबरदरम्यान छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
या छायाचित्र प्रदर्शनात रेल्वेच्या चोवीस वर्षांतील कामगिरीचे दुर्मिळ फोटो आणि कोरेच्या मॉडेल्सची माहिती देण्यात आली आहे. रेल्वेची स्थापना झाल्यापासून कोकण रेल्वेने विविध क्षेत्रात केलेली प्रगती या प्रदर्शनात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रदर्शाचे उद्घाटन कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानू प्रकाश तायल यांनी केले. उद्घाटनानंतर तायल यांनी रेल्वेच्या कामगिरीचा आढावा घेतला. कोकण रेल्वेने सामाजिक जबाबदारी संभाळून कोकण रेल शिक्षा अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा लाभ तीन हजार व्यक्तींनी आतापर्यंत घेतला आहे, असे तायल म्हणालेत.
छायाचित्र प्रदर्शन समारोपाच्या दिवशी कोकण रेल्वेत विशेष कामगिरी बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव करून पारितोषिकही देण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.