तिसऱ्या लग्नाची `फसलेली` गोष्ट!

तीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करणा-या एका महाठगाला मीरारोड पोलिसांनी अटक केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 29, 2013, 04:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
तीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करणा-या एका महाठगाला मीरारोड पोलिसांनी अटक केली आहे.
अमर सिंग नावाच्या या महाठगाने बिनदिक्कत तीन लग्न करुन गेली अनेक वर्षं तीन बायकांबरोबर लपाछपीचा खेळ तो खेळत होता. अमर सिंगची मीरारोडमध्ये दूधाची डेअरी आहे. याच डेअरीमध्ये दूध घेण्यासाठी मुस्कान रोज यायची. अमर आणि मुस्कान दोघांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत मग प्रेमात आणि त्यानंतर लग्नात झालं. काही दिवस संसार केल्यानंतर अमरनं मुस्कानला एका भाड्यानं घेतलेल्या घरात नेऊन ठेवलं. त्याच काळात अमरचं याआधीही लग्न झाल्याचं एका व्यक्तीनं मुस्कानला फोन करुन सांगितलं आणि अमरचा भांडाफोड झाला.
मुस्काननं याचा छडा लावायचा ठरवला आणि या लखोबा लोखंडेचा पर्दाफाश झाला. मुस्कानला भाड्याच्या घरात ठेवल्यानंतर अमरनं प्रिया या मुलीशी लग्न केलं. तर मुस्कान आणि प्रियाला जाळ्यात ओढण्याआधीच त्याचं 2005 मध्ये प्रीती सिंग नावाच्या मुलीशी लग्न झालं होतं.
या तरुणींच्या तक्रारीनंतर अमरसिंगला पोलिसांनी अटक केली. अमर सिंगच्या अमरप्रेमात या तीनही तरुणी अडकल्या आणि अमर या तिघींनाही फसवत राहिला. आता मात्र अमरप्रेमात फसलेल्या याच प्रिती, प्रिया आणि मुस्कान या तिघींनीही अमरला चांगलाच धडा शिकवलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.