www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे. दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीला तीन जादा कोच जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिसाला मिळणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणारी जनशताब्दी एक्सप्रेसला नेहमीच गर्दी असते. अनेकांना वेटींगवरच प्रवास करावा लागतो. तात्काळ तिकीट काढूनही त्याचा लाभ होत नाही. जनशताब्दीचे डबे वाढविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार १७ डब्यांची कायमस्वरूपी गाडी करण्यात येणार होती. मात्र, याची अजूनही प्रतिक्षा कायम आहे.
दरम्यान, वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने दोन अतिरिक्त द्वितीय श्रेणी आणि एक अतिरिक्त एसी चेअर कार कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १२०५१/१२०५२ दादर – मडगाव या एक्सप्रेसला ४ नोव्हेंबरपासून हे डबे जोडले आहेत. हे अतिरिक्त डबे १७ नोव्हेंबर २०१३ पर्यंत डबे जोडले जाणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.