लाकडापासून तयार होणार बॅटरी!

लिथियमचं कोटिंग असलेल्या लाकडापासून अगदी लहान पण, जास्त काळ टिकणारी आणि पर्यावरणाला हानी न करणारी अशी बॅटरी तयार केली जाऊ शकते, अशा निष्कर्षावर संशोधक पोहोचले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 22, 2013, 03:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
लिथियमचं कोटिंग असलेल्या लाकडापासून अगदी लहान पण, जास्त काळ टिकणारी आणि पर्यावरणाला हानी न करणारी अशी बॅटरी तयार केली जाऊ शकते, अशा निष्कर्षावर संशोधक पोहोचले आहेत. कागदापेक्षाही हजार पटीने पातळ असलेल्या या बॅटरीवर युनिवर्सिटी ऑफ मेरिलँडच्या वैज्ञानिकांनी अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ही बॅटरी अगदी ४०० वेळा रिचार्ज करुन वापरली जाऊ शकते.
या शोध प्रक्रियेशी संबंधित एका वैज्ञानिकाचं म्हणण आहे की, लाकडातील फायबर हे द्रव्य इलेक्ट्रोलाईट्स साठवण्यासाठी खुपच उत्तम माध्यम आहे. यामुळेच बॅटरीचा बेस चांगला बनू शकतो. सध्या तरी, हा बेस तयार करण्यासाठी काही कठोर साधनांचा वापर करण्यात येतोय. पण, यांच्या वापरामुळे बॅटरी कमकुवत बनू शकते.
या बॅटरीमध्ये लिथीयमच्या ऐवजी सोडियमचा वापर केला आहे, यामुळे ती इकोफ्रेंडली बनते. सोडियममध्ये लिथीयमपेक्षा ऊर्जा साठवण्याची क्षमता कमी असते. पण त्याची स्वस्त दरातली किंमत आणि घटकपूर्ण क्षमता हे त्याचे वेगळे स्थान बनवते आणि त्यामुळेच सोलर उर्जेच्या पावर प्लँटवर खूप सारी ऊर्जा साठवण्याची क्षमता यामध्ये आहे.