पाच मीटरच्या अंतरावरूनही चार्ज होणार मोबाईल, लॅपटॉप

ऊर्जास्त्रोतांपासून दूर आणि विजेच्या तारेशिवाय तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकता किंवा तुमचा टीव्हीही सुरू करू शकता. ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट नवनवीन प्रयोग करू पाहणाऱ्या संशोधनकर्त्यांमुळे शक्य झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 19, 2014, 02:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सियोल
ऊर्जास्त्रोतांपासून दूर आणि विजेच्या तारेशिवाय तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकता किंवा तुमचा टीव्हीही सुरू करू शकता. ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट नवनवीन प्रयोग करू पाहणाऱ्या संशोधनकर्त्यांमुळे शक्य झालीय.
वायरलेस ऊर्जेच्या अंतरात सुधारणा करत संशोधनकर्त्यांनी याची रेंज पाच मीटरपर्यंत वाढवलीय. `द कोरिया अॅडव्हॉन्स्ड इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी`चे प्रोफेसर चुन टी रिम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही गोष्ट शक्य करून दाखवलीय. त्यांनी `डीसीआरएस`चा प्रोटोटाईप विकसीत केलाय. त्यामुळे, पाच मीटर अंतरावरूनही तुम्ही एलईडी टेलिव्हिजन सुरू करू शकाल.
रिम यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीसीआरएसच्या मदतीनं एका मोठ्या एलईडी टेलिव्हिजिन आणि ४० व्हॅटच्या तीन पंख्यांना पाच मीटर अंतरावरून हाताळता येणं शक्य झालंय. रिमोट `पॉवर डिलीव्हरी मॅकेनिजम` या कंपनीनं ही शक्यता खरी करून दाखवलीय. या पद्धतीनं आत्तापर्यंत कुणीही काम केलं नव्हतं.
शोधकर्त्यांनी तयार केलेल्या रचनेत दोन ध्रुववाल्या चुंबकांचा वापर करण्यात आलाय. एका चुंबकाचा वापर चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी केला जातो तर दुसरं चुंबक विद्युत ऊर्जा प्राप्त करण्यासाठी वापरला जातो.
ज्यापद्धतीने आपण आज कधीही-कुठेही वायफाय क्षेत्र बनवतो तशाच प्रकारे वाय पॉवर क्षेत्रही बनविलं जाऊ शकेल जे विजेच्या तारांशिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत विद्युत ऊर्जा पोहचवू शकेल, असं रिम यांनी म्हटंलय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.