www.24taas.com, हुनान
अॅपलच्या आयफोन म्हणजे तरूणाईची आजची खरी ओळख बनत चालली आहे. आणि आत हीच ओळख मात्र याच तरूणाईच्या जीवावर उठली आहे. जगामध्ये आयफोनची क्रेझ तरूणांमध्ये भलतीच आहे.. चीनमध्ये एका विद्यार्थ्याने आयपॅड आणि आयफोन खरेदी करण्यासाठी स्वत:ची किडनी विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणातील पाच लोकांविरुद्ध खटला भरण्यात आला असून त्यात एका सर्जनचाही समावेश आहे. किडनीची शस्त्रक्रिया करताना हा १७ वर्षीय युवक थोडक्यात बचावल्याचे उघड झाले आहे.
या विद्यार्थ्याने १.९०० पौंडला स्वत:ची किडनी विकल्याचे स्पष्ट झाले असून हुनान प्रांतातील ही घटना आहे. या मुलाकडे एवढी महागडी उपकरणे खरेदी करण्यासाठी पैसा कुठून आला याचे आश्चर्य वाटून त्याच्या आईने त्याची धुलाई केली तेव्हा त्याने आपण किडनी विकल्याचे कबूल केले.
या मुलाची तब्येत अत्यंत नाजूक असून तो खटल्यात साक्ष द्यायलाही हजर राहू शकला नाही. ऍपलची उत्पादने चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय असून अजून आयफोन फाय बाजारात यायचा बाकी आहे. त्यानंतर लोक काय विकतील याची कल्पनाच केलेली बरी.