www.24taas.com, न्यूयॉर्क
परीक्षेत चांगले मार्क मिळावेत यासाठी अनेक अभ्यासू विद्यार्थी रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात. रात्रभर अभ्यास करून आपल्याला चांगले मार्क मिळतील असा त्यांचा समज असतो. मात्र, हा समज खोटा आहे. अभ्यासापोटी झोप टाळल्यास त्याचे उलटे परिणाम परीक्षेतील मार्कांवर होतात असं संशोधनातून सिद्ध झालं आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस अँजेलिसच्या शास्त्रज्ञांनी अनेक विद्य़ार्थ्यांचं स्रवेक्षण केलं. अभ्यास केला. यातून त्यांनी निष्कर्ष काढला, की जास्त अभ्यास केल्यास परीक्षेत कमी मार्क पडू शकतात. रोज आणि वर्षानुवर्षं रात्री जागून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर या गोष्टीचा परिणाम होतो. दिवसभर मेंदूला हलकीशी सुस्ती राहाते. यामुळेच मार्क कमी होण्याची शक्यता असते.
९वी, १०वी आणि १२वीतील ५५३ विद्यार्थ्यांनी १४ दिवस आपल्या डायरीत आपण रोज रात्री किती वाजेपर्यंत अभ्यास करतो याची नोंद ठेवत. याबरोबरच ते किती वाजता उठतात, किती वाजता झोपतात याचीही माहिती लिहिली. याव्यतिरिक्त शैक्षणिक समस्यांचाही परामर्श घेतला गेला. शाळेत शिकवलेलं त्यांना समजतंय का, गृहपाठ नीट होतोय का या गोष्टींचीही तपासणी केला.