सॅमसंगचा `गॅलक्सी ग्रॅन्ड` बाजारात दाखल...

स्मार्टफोनच्या जगात खळबळ उडवून देण्यासाठी साऊथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स तयार आहे. नुकताच या कंपनीनं ‘गॅलक्सी ग्रॅन्ड’ हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनची भारतातील किंमत आहे २१,५०० रुपये.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 22, 2013, 03:01 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
स्मार्टफोनच्या जगात खळबळ उडवून देण्यासाठी साऊथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स तयार आहे. नुकताच या कंपनीनं ‘गॅलक्सी ग्रॅन्ड’ हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनची भारतातील किंमत आहे २१,५०० रुपये.
‘बजेट स्मार्टफोन’ म्हणून सॅमसंगनं लॉन्च केलेल्या या फोनमध्ये ५ इंचाची WVGA TFT स्क्रीन आणि ८ मेगापिक्सल कॅमेऱ्याची सुविधा देण्यात आलीय. ‘अॅन्ड्रॉइड ४.१’वर हा फोन आधारित आहे. ड्युएल सिमकार्ड आणि सिंगल सिम कार्ड अशा दोन्ही प्रकारांमध्ये हा फोन उपलब्ध करण्यात आलाय. इनबिल्ट ८ जीबी मेमरी असलेल्या या फोनची क्षमता मायक्रो एसडी कार्डच्या आधारानं ६४ जीबीपर्यंत वाढवता येईल.

‘गॅलक्सी ग्रॅन्ड’ची वैशिष्ट्यं...
> ५ इंच WVGA TFT एलसीडी (८००X४८०) स्क्रीन
> सॉफ्टवेअर - अॅन्ड्रॉइड ४.१
> १.२ गेगाहर्टझ ड्युएल कोअर प्रोसेसर
> ८ मेगापिक्सल कॅमेरा आणि २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा (एलसीडी फ्लॅशसहीत)
> ८ जीबी इनबिल्ट मेमरी (६४ जीबीपर्यंत वाढवता येईल)
> २,१००mAH बॅटरीवर चालतो
> थ्रीजी, टूजी, वाय-फाय, ब्लू टूथ ४.०, एस व्हाईस