www.24taas.com, लंडन
अवजड डेस्कटॉप कॉम्प्युटरची जागा घेणारा लॅपटॉपही आता कालबाह्य होणार आहे. कारण याच लॅपटॉपची जागा पुढील पाच वर्षांत कागदासारखा पातळ असलेला ‘पेपर टॅबलेट’ घेणार आहे. काही संशोधकांनी एका अशा क्रांतिकारक टॅबलेटची निर्मिती केली आहे ज्याचे काम झाल्यावर तो कागदासारखा घडी घालून ठेवता येणार आहे.
कॅनडातील क्वीन्स विद्यापाठातील संशोधकांनी प्लास्टिक लॉजिक ऍण्ड इंटेल लॅब्सच्या सहयोगाने हा नवा टॅबलेट विकसित केला आहे. विशेष म्हणजे घडी घातल्यावरही तो तुटत नाही. फ्लेक्सिबल टचस्क्रीन असलेला हा जगातला पहिलाच टॅबलेट असल्याचा दावा प्लास्टिक लॉजिकच्या सीईओ इंद्रो मुखर्जी यांनी केला आहे.
पुढील आठवड्यात लास वेगास येथील कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये हा पेपर टॅबलेट लॉंच करण्याची कंपनीची योजना आहे.