www.24taas.com, मुंबई
प्रश्नपत्रिकेच्या चुकांसोबत विद्यापीठाचा कहर म्हणजे टीवाय बीकॉमची एमएचआरएमची नमुना उत्तर पत्रिकेतल्या एका प्रश्नाचं उत्तरच चुकवण्यात आलं होतं.
प्रश्न क्रमांक 2 मधील ब या 7 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं देण्यात आलं. यावर तब्बल दोन दिवस पेपर तपासणी झाली. आणि त्यानंतर विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातून बरोबर असलेली नमुना उत्तर पत्रिका देण्यात आली. उत्तरपत्रिका तपासणीच्या एका केंद्रात ही प्राध्यापकाच्या लक्षात आल्यानंतर विद्यापीठाला ही चूक दाखवून दिली गेली.
विद्यापीठाकडून या चुकीच्या नमुना पत्रिकेमार्फत तपासण्यात आलेले पेपर पुन्हा तपासण्यात येतील अशी माहिती वाणिज्य शाखेचे डीन मधू नायर यांनी दिली.