`मायक्रोमॅक्स`चा `कॅनव्हॉस २ कलर्स ए-१२०` बाजारात

भारतीय मोबाईल निर्माती कंपनी मायक्रोमॅक्सनं आपला एक नवा ड्युएल सिम स्मार्टफोन लॉन्च केलाय. हा हॅन्डसेट म्हणजे मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हॉस-२ची सुधारीत आवृत्ती आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 25, 2014, 06:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय मोबाईल निर्माती कंपनी मायक्रोमॅक्सनं आपला एक नवा ड्युएल सिम स्मार्टफोन लॉन्च केलाय. हा हॅन्डसेट म्हणजे मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हॉस-२ची सुधारीत आवृत्ती आहे. मायक्रोमॅक्सचा नवीन `कॅनव्हॉस २ कलर्स ए-१२०` हा स्मार्टफोन पाच रंगांत उपलब्ध आहे.
`कॅनव्हॉस २ कलर्स ए-१२०` हा फोन १.३ जीएचझेड क्वॉड प्रोसेसरच्या साहाय्यानं चालतो. मायक्रोमॅक्सनं आपल्या वेबसाईटवर या फोनबद्दल अधिकृतरित्या माहिती दिलीय. या फोनचा स्क्रीन पाच इंचाचा आहे तर रिझॉल्युशन १२८० X ७२० पिक्सलचं आहे. यामध्ये मीडिया टेकचा १.३ जीएचझेड क्वॉड कोअर प्रोसेसर एमटी ६५८२ आहे.
हा ड्युएल सिम स्मार्टफोन अॅन्ड्रॉईडवर ४.२ काम करतो. यामध्ये एक जीबी रॅम उपलब्ध आहे. तर या फोनची इंटरनल स्टोरेज क्षमता आहे ४ जीबी... यामध्ये एक्सीलेटर, लाईट आणी प्रॉक्सिमिटी सेंसरदेखील आहे.
यामध्ये ८ मेगापिक्सलचा ऑटो फोकस रिअर कॅमेरा आहे. तर पुढच्या बाजुला २ मेगापिक्सलचा फिक्स्ड कॅमेरा ज्यामध्ये एचडी व्हिडिओही रेकॉर्ड केला जाऊ शकतो.
थ्रीज, टू जी, वाय-फाय, जीपीएस आणि ब्लू टूथ ४.० हे फिचर्सदेखील या फोनमध्ये उपलब्ध आहेत. हा फोन पिवळा, निळा, हिरवा लाल आणि काळा या पाच रंगांत उपलब्ध आहे. या फोनची बॅटरी २००० एमएएचची आहे त्यामुळे तुम्हाला सात तासांचा टॉकटाईम मिळू शकतो. कंपनीनं या नव्या फोनची किंमत मात्र अद्यापही गुलदस्त्यातच ठेवलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.