९५ टक्के एटीएम ८ एप्रिलनंतर हॅक होऊ शकतात

एक महिन्याच्या आत जगभरातील सर्वात जास्त संख्येत `कम्प्युटर बेस्ड इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टम`ला हॅक करणं, हॅकर्ससाठी सोप होणार आहे.

Updated: Mar 18, 2014, 08:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एक महिन्याच्या आत जगभरातील सर्वात जास्त संख्येत `कम्प्युटर बेस्ड इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टम`ला हॅक करणं, हॅकर्ससाठी सोप होणार आहे.
जगभरातील ९५ टक्के जनता अजुनही एटीएम विंडोज एक्सपी ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करतात.
मायक्रोसॉफ्टकडून विंडोज एक्सपीचा सपोर्ट बंद होणार आहे, यानंतर हॅकर्सचं पहिलं टार्गेट एटीएम असू शकतं, यामुळे 95 टक्के एटीएमसाठी हॅकिंग आणि वायरसचा धोका वाढणार आहे.
मायक्रोसॉफ्ट ८ एप्रिलपासून विंडोज एक्सपी ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करणं बंद करणार आहे, या वर्जनला २००१ मध्ये रिलीज करण्यात आलं होतं.
अपडेटिंग बंद व्हायला महिनाही शिल्लक नसतांना बऱ्याच कंपन्या आजही मायक्रोसॉफ्ट विंडोज वापरतांना दिसतायत. कारण सिस्टम अपडेट करण्यासाठी लागणारा खर्च वाचवला जातोय.
सिस्टम अपडेट करण्यासाठी झालेला हा उशीर हॅकर्ससाठी हॅकिंगची पर्वणी ठरणार आहे.मात्र सिक्युरिटी एक्स्पर्टच्या मते मायक्रोसॉफ्ट विंडोज विंडोज ७, विंडोज ८ आणि विंडोज विस्टासाठी अपडेट देणे सुरू ठेवणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.