फेसबूक फोटोवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव!

तुम्ही फेसबूक अॅडीक्ट असाल... प्रत्येक दिवशी तुमच्या मित्रांचे बदललेले प्रोफाईल फोटोही पाहत असाल तर आता तुम्ही तुमच्या मित्रांना जास्त चांगल्या पद्धतीनं ओळखूही शकता.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 25, 2013, 08:42 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुम्ही फेसबूक अॅडीक्ट असाल... प्रत्येक दिवशी तुमच्या मित्रांचे बदललेले प्रोफाईल फोटोही पाहत असाल तर आता तुम्ही तुमच्या मित्रांना जास्त चांगल्या पद्धतीनं ओळखूही शकता. तेही केवळ प्रोफाईल फोटोच्या माध्यमातून... तुम्ही म्हणाल कसं बरं शक्य आहे हे?
सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात आपण सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर जे काही शेअर करतो, लाईक करतो त्या सगळ्या गोष्टी आपली मानसिकता आणि व्यक्तीमत्त्वाशी साधर्म्य दाखवणाऱ्या असतात. ‘यूनिव्हर्सिटी ऑफ मिसोरी’च्या एका अभ्यासानुसार, फेसबूकवर आपले लाईक्स, प्रोफाईल फोटो आणि इतर काही गोष्टी आपल्या मानसिक स्थितीचा अंदाज दर्शवतात. त्यामुळे फेसबूकवर जर तुम्ही आता एखाद्या नव्या व्यक्तीला भेटत असाल तर त्याच्या प्रोफाईल फोटोच्या आधारे तुम्ही त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा अंदाज घेऊ शकता.

पोट्रेट
पोट्रेट प्रोफाईल फोटो म्हणजेच एखादा असा फोटो जो डोक्यापासून कंबरेपर्यंत असेल आणि त्यात चेहरा व्यवस्थित दिसून येईल. असे लोक सामान्य व्यवहार करणारे आणि आत्मविश्वासपूर्ण असतात. ज्या फोटोंमध्ये खांद्यापासून वरपर्यंत चेहऱ्याचा क्लोजअप फोटो असेल अशी लोक आत्मकेंद्रीत असू शकतात.
लाँग शॉट
तुम्ही अनेकदा असे प्रोफाईल फोटो पाहिले असतील ज्यात एखादी व्यक्ती वरपासून खालपर्यंत दिसत असतो सोबतच बाजुचा नजाराही... परंतु या फोटोत तुम्ही त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे पाहू शकत नाहीत. अशी लोकांना सामान्यत: व्यक्तिगत जीवन सार्वजनिक करण्यामध्ये काहीही रस नसतो. अशी लोक स्वभावानं थोडी लाजाळू असतात.
खूप जास्त क्लोजअप
या पद्धतीच्या प्रोफाईल फोटोंमध्ये चेहरा इतका जवळ असतो की तुम्हाला स्पष्टपणे तो दिसू शकत नाही. फोटोतला सब्जेक्ट तुम्हाला शोधावा लागतो. अशा प्रोफाईल फोटो असणाऱ्या व्यक्तींमध्ये असुरक्षेची भावना असू शकते किंवा अशा लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते.
जुना फोटो
काही लोकांच्या प्रोफाईल फोटोच्या जागी त्यांच्या लहानपणीचे किंवा कित्येक वर्षांपूर्वीचे फोटो असतात. बऱ्याचदा असे लोक आपल्या भूतकाळाला आपल्या वर्तमानापेक्षा जास्त समाधानकारक आणि सुखकारक मानतात. आपल्या भूतकाळाबद्दल अशी लोक जास्त संवेदनशील असतात. किंवा मग अशी लोक जास्त फोटोजेनिक नसतात.

कुटुंबीयांचा आणि मुलांचा फोटो
बऱ्याचदा काही लोक आपल्या प्रोफाईल फोटोमध्ये आपल्या मुलांचा किंवा आपल्या कुटुंबाची फोटो लावतात. अशा लोकांचा सामाजिक जीवनावर विश्वास असतो. तसंच आपलं खाजगी जीवन सगळ्यांशी शेअर करायला ते कचरत नाहीत. ज्या लोकांच्या प्रोफाईलवर अनेकदा त्यांचा मुलांसोबतचा फोटो बदलत असतो असे लोक स्वत:च्याच दुनियेत धुंद राहणारे असू शकतात.

पार्टी करतानाचा फोटो
एखाद्या खास क्षणाची गोष्ट निराळी पण असे लोक जे मित्र-मैत्रिणींसोबत मजा-मस्ती आणि पार्टी करतानाचा आपला फोटो प्रोफाईल फोटो म्हणून दर्शवितात, असे लोक थोडे बेजबाबदार असतात. तसंच त्यांची स्वत:ची अशी काहीही ओळख नसते.
आर्ट पोर्टफोलिओ
प्रोफाईल पोर्टफोलिओमध्ये आर्ट पीस, एखाद्या विषयाविना काढलेलं चित्र, सीनरी अशा गोष्टींचा फोटो लावणारे लोक बऱ्याचदा लोकांनी आपल्याला बुद्धीजीवी समजावं अशा प्रयत्नात असतात. परंतु, खरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्वत:ला काय आवडतं हे त्यांनाही माहित नसतं. यातही काही जण अपवाद असू शकतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.