`मायक्रोसॉफ्ट`चं अपडेट व्हर्जन मिळवा मोफत!

तुमच्या कम्प्युटरसाठी तुम्हाला, आजच्या काळातील लोकप्रिय कम्प्युटर ऑपरेटींग सिस्टम `मायक्रोसॉफ्ट विंडोज` मोफत मिळाला तर... विश्वासचं बसत नाही ना? मात्र हे खरं आहे.

Updated: Mar 2, 2014, 04:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुमच्या कम्प्युटरसाठी तुम्हाला, आजच्या काळातील लोकप्रिय कम्प्युटर ऑपरेटींग सिस्टम `मायक्रोसॉफ्ट विंडोज` मोफत मिळाला तर... विश्वासचं बसत नाही ना? मात्र हे खरं आहे.
सर्वांत मोठी सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या `मायक्रोसॉफ्ट`नं आपलं ऑपरेटिंग सिस्टम `विंडोज`चं मोफत वर्जन बाजारात उतरवण्याची तयारी केलीय.
`विंडोज ८.१` चे हे `अपडेट व्हर्जन` असेल... दोघांमध्ये जास्त फरक नाही... मात्र, `विंडोज ८.१` तुमच्या कम्प्युटरवर वापरण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार नाही किंवा पायरेटेड व्हर्जन मिळवण्याची धडपडही करावी लागणार नाही. मोफत व्हर्जनमुळे यूझर्सची संख्या वाढवता येईल, अशी आशा कंपनीला आहे.
सध्या कंपनी मोफत व्हर्जनची चाचणी करत आहे. मायक्रोसॉफ्टच्या मोफत व्हर्जनमध्येही तुम्हाला बरेचसे जुनेच अॅप्लिकेशन्स पाहायला मिळतील. कॉन्ट्रोव्हर्शियल `टाईल स्टार्ट स्क्रीन` बदलून क्लासिक विंडोज डेस्कटॉप देणार आहे.
मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या फ्री व्हर्जनचा फायदा टॅब, मोबाईल आणि माऊस की-बोर्ड वापरणाऱ्या यूझर्सलाही होणार आहे.
तसेच मार्चअखेरपर्यंत विंडोज स्टोअरमध्ये एक लाख अॅप्स मिळण्याची शक्यता आहे. विंडोजही खुल्या बाजारात एन्ट्री घेणार असल्यानं अँन्ड्रॉईडसमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.
लवकरच बाजारात विंडोज आणि अँड्रॉई़ड ऑपरेटिंग सिस्टम एकत्र असणारे स्मार्टफोन उपलब्ध होण्याची चिन्हं आहेत.
नुकतंच भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सनं विंडोज आणि अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम एकत्र असलेला लॅपटॉप बाजारात उतरवलाय. यासाठी मायक्रोसॉफ्टनं कार्बनशी हातमिळवणी केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.