www.24taas.com, झी मीडिया, न्युयॉर्क
फेसबुक वित्त सेवा सुरु करण्याच्या विचारात आहे. तसे वृत्त हाती आले आहे. फेसबुकने इलेक्ट्रॉनिक मनी आणि पैसे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. त्यासाठी फेसबुकने सेंट्रल बँक ऑफ आयर्लंडकडे तशी परवानगी मागितली आहे.
सेंट्रल बँक ऑफ आयर्लंडने फेसबुकची मागणी मान्य केली तर सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून बॅंकेप्रमाणे व्यवहार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पैसे पाठविणे, पैसे जमा करणे आणि ऑनलाईन शॉपिंग करणे शक्य होणार आहे.
या सेवेचा सर्वाधिक फायदा परदेशात काम करणाऱ्यांना होणार आहे. ते तात्काळ पैसे आपल्या घरी पाठवू शकतात. `द फायनेंशियल टाइम्स`ने याबाबत वृत्त दिली आहे. जर फेसबुकने ही सेवा देण्यास सुरुवात केली तर फेसबुकला करोडो युजर्सना (सदस्य ग्राहक) त्याचा फायदा होईल.
ज्यांना पैसे सुरक्षितपणे जमा करणे शक्य नसते त्यांना या सेवेचा अधिक लाभ होईल. दरम्यान, याबाबत मेल ऑनलाईनने याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सेंट्रल बँक ऑफ आयर्लंडने याबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले. दरम्यान, फेसबुक अफवांवर टिप्पनी करीत नाही. 10 कोटी युजर्स भारतात असल्याचा दावा फेसबुकने केला आहे.
अमेरिकेनंतर भारताचा नंबर लागलो. मात्र, असे असले तरी जगात फेसबुक ऑनलाईन वित्त सेवा देणार नाही तर आधी चीनचे टँसेट आणि अलीबाब या साईट ही मोबाईल पेमेंट प्लॅटफॉर्म बनविण्याचे काम करीत आहे. गूगलने मोबाईल पेमेंट आणि वॉलेट सर्व्हिसेसमध्ये वाढ केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.