www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या पिकावर कोणता रोग पडलाय आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं, हे शेतकऱयांना आता एका क्षणात समजणार आहे.
यावर देवगिरीअभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपाय शोधून काढला आहे. यासाठी या विद्यार्थ्यांनी प्लॅन्ट डिसीज डिरेक्टर या मोबाईल ऍपची निर्मिती केली आहे.
देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्राच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थी विनय कर्डीले, पुष्कर जोशी, गौरव बागूल, शौनक दातार हे यावर संशोधन करीत आहेत.
पिकांवर पडलेल्या रोग किंवा किडीचा ऍप्सद्वारे फोटो काढायचा. तो स्कॅनिंग केल्यानंतर त्यावर उपाय सुचविण्याचे काम ऍप्स करणार आहे.
तसेच हवामानातील बदलानुसार फवारणीचा सल्लादेखील शेतकऱ्यांना मिळेल. यासाठी विद्यार्थी संशोधनात गुंतले आहेत.
एरवी पिकांवर रोग पडल्यावर फवारणी कोणती करायची, याची सल्लामसलत शेतकरी औषध दुकानदारांशीच करतात. हे ऍप्स कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल.
सध्या कापूस पिकावरील रोगांचा मुकाबला करण्यासाठी कसे ऍप्स विकसित करता येईल, याचे संशोधन सुरू आहे.
यात मराठवाडा आणि विदर्भातील वातावरणाचा अभ्यास केला जातोय. वातावरणातील बदलांमुळे कोणते रोग पडतील, याचीही माहिती शेतकऱ्यांना ऍप्सद्वारे मिळेल. यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
सहा महिन्यांत हे ऍप्स तयार होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यासाठी लागणारा खर्चही महाविद्यालय करणार आहे.
आयडियालाच इनोव्हेशन ऍवॉर्ड नटराजन एज्युकेशन सोसायटीज इनोव्हेशन 2014 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 50 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक या विद्यार्थ्यांच्या ऍप्सच्या आयडियाला मिळाले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.