किंमत घटल्यानंतर `ब्लॅकबेरी Z-१०`चा स्टॉकच संपला

`ब्लॅकबेरी`च्या झेड १० मोबाईल फोनचा स्टॉकच संपुष्टात आलाय. कंपनीनं या फोनची किंमत दोन टप्प्यांत जवळजवळ ६० टक्क्यांनी कमी केली होती.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 4, 2014, 08:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
`ब्लॅकबेरी`च्या झेड १० मोबाईल फोनचा स्टॉकच संपुष्टात आलाय. कंपनीनं या फोनची किंमत दोन टप्प्यांत जवळजवळ ६० टक्क्यांनी कमी केली होती. त्यानंतर, अवघ्या १७,९९० रुपयांत उपलब्ध झालेल्या या फोनची मागणी अचानक वाढल्याचं दिसून आलं होतं.
कंपनीनं `झेड-१` हा मोबाईल साधारणत: वर्षभरापूर्वी ४३,४९० रुपयांना ग्राहकांसमोर आणला होता. त्यानंतर सप्टेंबर २०१३ मध्ये या फोनची किंमत कमी करून ती २९,९९० करण्यात आली. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांतच पुन्हा एकदा या स्मार्टफोनची किंमत कमी झाली आणि फेब्रुवारीमध्ये या फोनची किंमत आली १७,९९० रुपयांवर.

ब्लॅकबेरीचे प्रवक्यांनी एका ई-मेलला धाडलेल्या उत्तरात हा खुलासा केलाय. `आमच्या ब्लॅकबेरी झेड-१० चा स्टॉक संपुष्टात आलाय, असं त्यांनी यात म्हटलं. नवीन स्टॉक पुढच्या काही दिवसांत येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.