www.24taas.com , झी मीडिया, कॅलिफोर्निया
अॅपलनं आतापर्यंतचा सर्वात स्वस्त आयफोन लाँच केलाय. काल कॅलिफोर्निया इथं आयफोनचं लॉन्चिंग करण्यात लं. अॅपलच्या मुख्य कार्यालयात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुकनं हे फोन लाँच केले. आयफोन ५सी आणि आयफोन ५एस ही या नव्या आयफोनची नावं आहेत.
१३ सप्टेंबरपासून ग्राहक या फोनचं प्री-बुकिंग करु शकतात. २० सप्टेंबरपासून अमेरिकेतल्या बाजारपेठेत हे नवीन आयफोन विक्रीसाठी उपलब्ध होतील. तर डिसेंबर २०१३पर्यंत १००हून अधिक देशांमध्ये हे फोन विक्रीसाठी असतील. अॅपलचा हा स्मार्टफोन आयफोन ५ची जागा घेईल, जो मागील वर्षी लाँच करण्यात आला होता.
भारत आणि चीनमधील बाजारपेठ लक्षात घेऊन नव्या आयफोनची किंमत ठरवली गेलीय. आयफोनची किंमत १० हजारांपेक्षाही कमी म्हणजे जवळपास ७ हजारांपर्यंत असेल.
१६ जीबी या फोनची किंमत ९९ अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास ६ हजार ३७४ रुपये ठेवण्यात आलीय. तर ३१ जीबी फोनची किंमत १९९ अमेरिकी डॉलर म्हणजेच जवळपास १२ हजार ८१२ रुपये इतकी असेल.
आयफोन ५एस चे फिचर्स-
> आयफोन ५एसमध्ये ६४ बीट चीप
> ३२ बीटच्या अॅप्ससोबत कम्पॅटिबल
> A7 प्रोसेसरनं युक्त
> पहिल्या आयफोनच्या तुलनेत ५६ पट जास्त जलद
> हाय-ग्रे अॅल्युमिनियमनं बनलेला फोन
> आयओएस ७ वर चालणारा फोन
> सेंसर साईज १५ टक्क्यांनी वाढली
> त्रांतिकदृष्ट्या जगातील सर्वात उत्तम स्मार्टफोन
आयफोन ५सी चे फिचर्स-
> आयफोन ५सी हँडसेटमध्ये ८ मेगापिक्सल कॅमेरा
> १.९ मेगापिक्सल फ्रन्टकॅमेरा
> ४.० ब्लूट्यूथ
> ४जी, वायफायची सुविधा
> निळा, पिवळा, हिरवा, गुलाबी आणि पांढऱ्या रंगांमध्ये उपलब्ध
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.