www.24taas.com, नवी दिल्ली
दूरसंचार सेवा देणाऱ्या एअरटेल या कंपनीला सुप्रीम कोर्टाने आज चांगलाच झटका दिला. एअरटेलला ७ विभागात नवे ३जी ग्राहक बनविण्यास आणि ३जी सेवा देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी कंपनीजवळ लायसेंस नाहीये. मुख्य न्यायाधीश अल्तमस कबीर आणि न्यायमूर्ती विक्रमजीत सेन यांच्या खंडपीठाने कम्युनिकेशनच्या याचिकेवर सुनावणी हा आदेश करताना दिला.
एअरटेल कंपनीला झटका दिला असला, तरी त्यांच्यावर असणाऱ्या ३५० कोटी रूपयाचा दंड भरू नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाहीये. भारती एअरटेलच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा आदेश क्रमाने आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. दूरसंचार विभागाने कंपनीला ३जी सेवा तत्काळ बंद करण्यास सांगितले होते. कारण की त्यांच्याकडे त्यासाठी आवश्यक लायसंस नाहीये.
दूरसंचार विभागाने एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया सेल्युलर यांच्यामध्ये झालेल्या रोमिंग कराराला अनधिकृत ठरविले आहे. या करारानुसार एअरटेल त्या सात विभागात ३जी सेवा उपलब्ध करून देणार होता. ज्यासाठी त्यांच्याकडे लायसंस नाहीये.