मुंबई : क्रिकेटमध्ये युवराज सिंहच्या नावावर एक रेकॉर्ड आहे, तो म्हणजे सहा चेंडूत सहा षटकार. हे षटकार तुम्ही आजही पाहिजे तरी रोमांचक वाटतात.
इंग्लंडचा बॉलर फ्लिंटॉपने युवराज सिंहला खुन्नस दिल्यानंतर, युवराजचा पारा असा काही तापला की त्याने फ्लिंटॉपचा लाल चेहरा गोरा-मोरा करून टाकला, या व्हिडीओत दोन गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.
युवराजचे सहा चेंडूत सहा षटकार, आणि त्यानंतर बॉलर फ्लिंटॉपचा झालेला गोरामोरा चेहरा... युवराज सिंहने हे सहा षटकार लावले तेव्हा पिचवर या घटनेला जवळून पाहणारा साक्षीदार होता, टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, तुम्ही साक्षीदार होऊ शकतात, पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल...