नवी दिल्ली : युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी म्हटलं आहे की, महेंद्र सिंह धोनीला युवराज सिंहला वर्ल्डकपच्या टीममध्ये घ्यायचं नव्हतं, म्हणून युवराज सिंहचा टीम इंडियात समावेश झाला नाही.
मात्र युवराज सिंहने काही वेळातच आपल्या पित्याचं वक्तव्य खोडून काढलं आहे, सर्वांच्या आईवडिलांप्रमाणे माझे वडिलही भावनिक झाले आहेत, ते भावनेच्या भरात बोलले असतील असं युवराज सिंहने म्हटलं आहे.
माहीने आम्हाला नेहमीच चांगलं खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची मजा काही औरच असल्याचंही युवराज सिंहने म्हटलं आहे. युवराज सिंहने ही प्रतिक्रिया ट्ववीटरवर दिली आहे.
युवराज सिंहला आयपीएल टीमने लिलावात १६ कोटी रूपयांना खरेदी केल्यानंतर युवराजचे वडील योगराज सिंह यांनी, धोनीने युवराजला टीममध्य़े घेतले नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
युवराजला धोनीने टीममध्ये घेतलं नसलं तरी देव सर्व काही ठिक करेल, धोनीला पुढील काळात हे दिसून येणार असल्याचं योगीराज यांनी म्हटलं आहे. माझ्या मुलाने पंधरा वर्ष टीम इंडियासाठी घाम गाळला, ९० टक्के सामने जिंकले, धोनीसोबत खेळून अनेक टुर्नामेंट जिंकले, असंही योगराज सिंह यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.