परदेशातील टी-२० लीगमध्ये खेळणार युसुफ पठाण

भारताचा क्रिकेटपटू युसुफ पठाण गेल्या अनेक वर्षांपासून संघाबाहेर आहे. आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता.

Updated: Feb 13, 2017, 01:31 PM IST
परदेशातील टी-२० लीगमध्ये खेळणार युसुफ पठाण title=

नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू युसुफ पठाण गेल्या अनेक वर्षांपासून संघाबाहेर आहे. आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. मात्र चौथ्या सीझनपासून तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे. मात्र युसुफ आता परदेशातील संघात खेळताना दिसणार आहे. 

कोणत्याही परदेशातील टी-२० संघात खेळणारा युसफ पठाण भारताचा पहिला क्रिकेटपटू असणार आहे. युसुफ हाँगकाँग लीगमध्ये खेळणार आहे. ८ मार्च ते १२ मार्चदरम्यान ही लीग होणार आहे. युसुफ या लागीमध्ये कॉलून कँटन्ससंघाकडून खेळणार आहे. 

पठाणने या लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल बीसीसीआय आणि बडोदा क्रिेकेट संघाचे आभार मानलेत. ३४ वर्षीय युसुफ २०१२मध्ये शेवटचा भारतीय संघात खेळला होता.