रांची : शुक्रवारी झालेल्या श्रीलंकेविरोधात झालेली दुसरी टी-20 भारताने ६९ रन्सने जिंकली. पण कालच्या सामन्यात एक वर्ल्ड रेकॉर्ड बनता बनता राहिला. युवराज सिंगने काल एक रन जरी काढला असता तरी हा रेकॉर्ड त्याच्या नावे झाला असता.
दुसऱ्या टी-२० मध्ये युवराज पहिल्याच बॉलमध्ये मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. जर त्याने एक रन जरी काढला असता तर तो टी-२० फॉरमॅटमध्ये ४० सामन्यांमध्ये एकदाही शुन्य रनवर आऊट न होण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे झाला असता. सध्या हा रेकॉर्ड शोएब मलिक याच्या नावावर आहे.
३९ सामन्यांसह युवराज आता दुसऱ्या स्थानकावर आहे.