नवी दिल्ली : कुस्तीपटू नरसिंह यादव दुसऱ्या डोप टेस्टमध्येही पॉझिटिव्ह आढळलाय. यामुळे आता नरसिंह यादवच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या सगळ्या आशा संपल्यात.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंहऐवजी प्रवीण राणाचं नाव पुढे पाठवण्यात आलंय आणि ते स्वीकारही करण्यात आलंय.
Wrestler Narsingh Yadav failed the second dope test (B Sample), which was taken on July 5th.
— ANI (@ANI_news) July 27, 2016
Praveen Rana's name has been sent and accepted too. :WFI Pres Brij Bhushan Sharan Singh #RioOlympics pic.twitter.com/2HHz3JsylF
— ANI (@ANI_news) July 27, 2016
दरम्यान, नरसिंह यादवचा मुद्दा संसदेतही उपस्थित झाला. रंजीत रंजन यांनी लोकसभेत नरसिंह यादवचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी आणि दोषीला कडक शिक्षा मिळावी अशी त्यांनी मागणी केली.