म्हणून धोनीच्या राजीनाम्याविषयी सेहवाग गप्प होता

महेंद्रसिंग धोनीनं वनडे आणि टी20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेटविश्वातून याबद्दल प्रतिक्रिया येत होत्या.

Updated: Jan 7, 2017, 09:59 PM IST
म्हणून धोनीच्या राजीनाम्याविषयी सेहवाग गप्प होता  title=

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीनं वनडे आणि टी20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेटविश्वातून याबद्दल प्रतिक्रिया येत होत्या. पण ट्विटरवर ऍक्टिव्ह असणारा सेहवाग मात्र धोनीच्या या निर्णयाबद्दल काहीच बोलला नाही.

सेहवाग आणि धोनीमध्ये वाद असल्याचं वारंवार बोललं गेल्यामुळे सेहवागनं बाळगलेल्या मौनाविषयी शंका उपस्थित होत होत्या. अखेर सेहवागनंही धोनीच्या राजीनाम्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी तीन दिवसानंतरच का बोललो तेही सेहवागनं सांगितलं आहे.

आज सात तारीख आहे. सात हा धोनीचा आवडता क्रमांक आहे. त्याचा वाढदिवस सात तारखेला असतो तसंच त्यानं नेहमी सात नंबरची जर्सी घातली. त्यामुळे त्याला शुभेच्छा देण्यासाठी सात तारीखच योग्य आहे, असं सेहवाग म्हणाला आहे.