सामन्यानंतर बरिंदर सरनचा ट्रान्सलेटर बनला मनदीप सिंग

झिम्बाब्वेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात भारताने विजय मिळवत टी-२० मालिकाही खिशात घातली. या मालिकेत मॅन ऑफ दी सीरिजचा पुरस्कार बरिंदर सरन याला देण्यात आला. 

Updated: Jun 23, 2016, 11:50 AM IST
सामन्यानंतर बरिंदर सरनचा ट्रान्सलेटर बनला मनदीप सिंग title=

हरारे : झिम्बाब्वेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात भारताने विजय मिळवत टी-२० मालिकाही खिशात घातली. या मालिकेत मॅन ऑफ दी सीरिजचा पुरस्कार बरिंदर सरन याला देण्यात आला. 

या पुरस्कार वितरणादरम्यान बरिंदरला इंग्रजीत प्रश्न विचारण्यात आला. मात्र बरिंदर हरियाणाचा असल्याने त्याचे इंग्रजी कच्चे आहे. त्यामुळे मनदीप सिंगला त्याचा ट्रान्सलेटर बनावे लागले. 

काय घडलं नेमकं तिथे

सामन्यानंतर पुरस्कार वितरणादरम्यान मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार देताना बरिंदरला इंग्रजीत प्रश्न विचारण्यात आला. बरिंदरला इंग्रजी समजत नसल्याने त्याने धोनीकडे पाहिले आणि हसला. त्यानंतर मनदीप त्याच्या मदतीला आला. त्यानंतर अँकरचा प्रश्न मनदीपने बरिंदरला हिंदीत ट्रान्सलेट करुन सांगितला. त्यानंतर बरिंदरने त्याचे उत्तर हिंदीत दिले आणि मनदीपने अँकरला इंग्रजीत ट्रान्सलेट करुन सांगितले. 

बरिंदरने झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांत भारताकडून सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. ज्यामुळे त्याला मॅन ऑफ दी सीरिजचा किताब देण्यात आला. पदार्पणातच बरिंदरला हा मान मिळाला.