कोहलीनं सांगितलं मला टीममधून काढा

सध्याच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणजे विराट कोहली. आयपीएलमध्ये पहिल्या मोसमापासून रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरकडून खेळलेल्या कोहलीची यंदाच्या आयपीएलमध्येही जोरदार चर्चा आहे.

Updated: Apr 15, 2016, 06:26 PM IST
कोहलीनं सांगितलं मला टीममधून काढा title=

मुंबई: सध्याच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणजे विराट कोहली. आयपीएलमध्ये पहिल्या मोसमापासून रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरकडून खेळलेल्या कोहलीची यंदाच्या आयपीएलमध्येही जोरदार चर्चा आहे. पण आयपीएलच्या सुरुवातीच्या काळामध्ये मला टीममधून काढून टाका अशी धमकीच कोहलीनं बैंगलोरच्या टीम मॅनेजेमंटला दिली होती. 

का दिली कोहलीनं धमकी ?

बैंगलोरकडून खेळताना सुरुवातीच्या काळात मिळत असलेल्या बॅटिंग नंबरवर कोहली खुष नव्हता. मला सुरुवातीला बॅटिंगला पाठवा किंवा टीममधून वगळा असं कोहलीनं सांगितलं होतं. मी जिकडे बॅटिंग करतोय तिथे मी स्वत:ला आणि टीमला न्याय देत नाहीये, त्यामुळे माझ्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला संधी द्या असं कोहलीनं खडसावलं होतं. 

टीमनंही कोहलीचं ऐकलं

टीम मॅनेजमेंटनं माझं ऐकलं आणि मला सुरुवातीलाच बॅटिंगला पाठवल्याचं कोहली म्हणाला. मिड-डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोहलीनं आयपीएलमधल्या त्याच्या सुरुवातीच्या काळावर भाष्य केलं आहे. आयपीएलचा पहिला सिझन म्हणजेच 2008 पासून कोहली बैंगलोरच्या टीमकडून खेळत आहे.